Status प्रमाणे २४ तासांत गायब होणार WhatsApp मेसेज, जाणून घ्या डिटेल्स

WhatsApp युजर्संसाठी नवीन-नवीन फीचर्स आणतेय

0 37

नवी दिल्लीः WhatsApp वर लवकरच स्टेट्स प्रमाणे पाठवण्यात आलेले मेसेज २४ तासांत आपोआप गायब होतील. गेल्या वर्षी कंपनीने टेलिग्रामप्रमाणे डिसअपीयरिंग मेसेज फीचर (whatsapp disappearing messages) जारी केले होते. सध्या या फीचर मध्ये ७ दिवसांची मर्यादा देण्यात आली आहे. म्हणजेच या फीचरला इनेबल केल्यानंतर पाठवण्यात आलेले मेसेज ७ दिवसांनंतर आपोआप गायब होतात. परंतु, कंपनी आता यात बदल करणार आहे.

२४ तासांत मेसेज गायब होणार
ताज्या रिपोर्टनुसार, नवीन व्हर्जन मध्ये व्हाट्सअॅप २४ तासाचे ऑप्शन जोडत आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हाट्सअॅपच्या iOS व्हर्जनमध्ये नवीन फीचरची टेस्टिंग केली जात आहे. या फीचर द्वारे पाठवण्यात आलेले मेसेज व्हाट्सअॅपवर २४ तासांच्या आत गायब होणार आहेत. परंतु, हे सर्व जो व्यक्ती मेसेज पाठवतो तो हे सर्व ठरवू शकणार आहे. या फीचरला इनेबल करायचे की नाही.

२४ तासात ७ दिवसांची सुविधा आधी प्रमाणे मिळत राहणार आहे. व्हाट्सअॅपच्या डिसअपिरिंग मेसेज फीचर मध्ये सध्या ७ दिवसांची लिमिट दिली आहे. रिसिवर तुम्हाला मेसेज कॉपी सुद्धा करू शकता. तसेच स्क्रीनशॉट घेऊ शकता. कंपनीने हे फीचर पर्सनल चॅट आणि ग्रुप चॅट दोन्हीसाठी जारी करण्यात आले होते. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, नवीन फीचर भविष्यात अपडेट केले जाऊ शकते. जे iOS आणि Android सह सर्व प्लॅटफॉर्मसाठी जारी केले जाणार आहेत. कंपनी एका महिन्याहून जास्त वेळेसाठी या फीचरवर काम करीत आहे. २४ तासाचे फीचर ग्रुप चॅटसाठी काम करणार आहे की नाही, यासंबंधी सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.