मोठी बातमी: Whatsapp ग्रूपवरील सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

पीडित महिलेने याविरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीची तक्रार दाखल केली होती. | Whatsapp group admin

0 18

नागपूर: व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील एखाद्या सदस्याच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिनला (Whatsapp admin) जबाबदार धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. उच्च न्यायालयचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आगामी काळात व्हॉटसअ‍ॅप (Whatsapp) ग्रूपवरील वादग्रस्त माहितीमुळे निर्माण झालेल्या वादात आणि गुन्ह्यांमध्ये या निर्णयाचा आधार घेतला जाऊ शकतो. (Mumbai HC decision on case filed against Whatsapp group admin)

काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्यातील किशोर तारोने या व्यक्तीने तयार केलेल्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपमध्ये एका महिलेविरोधात मानहानीजनक मेसेज टाकण्यात आला होता. पीडित महिलेने याविरोधात न्यायालयात धाव घेत मानहानीची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणाची नागपूर खंडपीठात सुनावणी सुरु होती. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती झेड इ हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सदस्यांच्या बेकायदेशीर कृतीसाठी अ‍ॅडमिन जबाबदार नसल्याचे स्पष्ट केले. कायद्यात तशी तरतूद नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

काही महिन्यात ‘या’ स्मार्टफोन्समधून WhatsApp बंद होणार

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅप Whatsapp आता काही फोनमधून गायब (Whatsapp ban in old version phone) होणार आहे. आयओएस 8 आणि अँड्रॉईड 2.3.7 किंवा जुनी ऑपरेटिंग सिस्टममध्ये व्हॉट्सअॅप बंद (Whatsapp ban in old version phone) केले जाणार आहे. या सर्व जुन्या फोनमधील कॅपॅबिलीटी 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपणार आहे.

ज्या फोनमध्ये ही जुनी ऑपरेटिंग सिस्टम असेल त्या फोनमध्ये Whatsappचालणार नाही. तसेच ज्या फोन जुन्या सिस्टम असलेल्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप आहे ते सुरु राहिल. पण जर ते uninstall केले आणि पुन्हा install करण्याचा प्रयत्न केला. तर ते install होणार नाही. WABetainfo ने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.