“करीनासोबत लिव्हइनमध्ये राहायचंय”, सैफने बबीता कपूर यांना विचारताच त्या म्हणाल्या…

एका मुलाखतीत करीनाने हा खुलासा केला आहे.

0 42

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. यांच्या लव्ह स्टोरीबद्दल तर सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, लग्नाच्या आधी सैफला करीनासोबत लिव्हइनमध्ये रहायचं होतं. या बद्दल सैफने स्वत: करीनाची आई बबीता कपूरला विचारलं होतं. याचा खुलासा सैफने स्वत: केला आहे. तर, त्यावर आईची प्रतिक्रिया काय होती, याचा खुलासा करीनाने केला आहे.

२०१९ मध्ये ‘ह्यूम्स ऑफ बॉम्बे’ला करीनाने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत सैफसोबत लिव्हइनमध्ये राहण्यापूर्वी आईला सगळं माहितं पाहिजे म्हणून त्या दोघांनी मिळून करीनाची आई बबीताला सांगितलं. करीना म्हणाली सैफ माझ्या आईला म्हणाला, “आम्ही काही वेळेपासून एकमेकांना डेट करतोय. मी काही २५ वर्षांचा नाही आणि मी तिला रोज रात्री घरी सोडू शकत नाही. त्यामुळे मला माझं उर्वरित आयुष्य करीनासोबत घालवायचं आहे. आम्हाला एकत्र राहायचं आहे. ”

करीना पुढे म्हणाली, “माझी आई खूप मस्त आहे. तिच्यासाठी हे खूप सोपे होते. जेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिला ते योग्य वाटले.”

करीनाने तिच्या लिव्हइनचा संदर्भ देताना म्हणाली,” मी आणि सैफ यापूर्वी बर्‍याचदा भेटलो होतो, पण ‘टशन’ च्या शूटिंगच्या वेळी काहीतरी वेगळं होतं. मला प्रेम झालं होतं. मला त्याचे लूक्स प्रचंड आवडले होते. तो माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे आणि त्याला दोन मुलं देखील आहेत. पण माझ्यासाठी तो फक्त सैफ होता. सैफने मला स्वत: वर प्रेम करायला शिकवलं.”

 

पुढे करीनाने तिच्या करिअरच्या संघर्षांबद्दल सांगितले. “मी करिअरमध्ये संघर्ष करत असताना सैफ नेहमी माझ्यासोबत असायचा. मी अनेक चित्रपट केले मात्र त्यानंतर मी एक वर्ष काम केले नाही. मला वाटले जणू माझे करिअर संपले. पण सैफने मला सांगितले की पुन्हा एकदा स्वत: ला शोधण्याची शुन्यापासून सुरुवात कर. हे प्रेम होते, मी दुर्बल होते आणि त्यावेळी सैफ माझ्यासोबत उभा होता.”

Leave A Reply

Your email address will not be published.