राष्ट्रवादीचा युवा नेता, दंगलखोर! कोण आहे राजकुमार ढाकणे ज्याची फडणवीसांच्या तक्रारीवरून हकालपट्टी झालीय?

0 7

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विरोधात होणाऱ्या तक्रारींबाबत चौकशीसाठी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण गठित करण्यात आला होता. 14 जुलै 2020 रोजी राजकुमार ढाकणे याच्या नियुक्ती संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाने नोटीफिकेशन काढले होते.

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य राजकुमार ढाकणे (Rajkumar Dhakane) याची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपासात ढाकणेविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे याच्या नियुक्तीवरुन मोठा वादंग उठला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेला हटवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. (Who is Rajkumar Dhakane removed from Maharashtra State Police Complaints Authority due to criminal background)

कोण आहे राजकुमार ढाकणे?

राजकुमार ढाकणे याचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय

पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पूर्ण पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हॉल्वरचा दस्ता मारुन त्याला गंभीर जखमी केलं होतं. याप्रकरणी 2015 मध्ये दाखल गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरु

याच प्रकरणात ढाकणे अटक असतानाही पळून गेल्याचा दुसरा गुन्हाही दाखल (2015)

कोरेगाव पार्क पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती (2016)

जागेवर अतिक्रमण करून कट करून फसवणूक केल्याचा गुन्हा (2017)

पुणे महापालिकेचे अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचे दोन गुन्हे

फिनिक्स मॉलमध्ये बेकायदा घुसून दंगल माजवल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाणे (2014)

रुबी हास्पिटलचे डॉक्टर सदरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार

राजकुमार ढाकणे याच्या डीआर एन्टरप्रायजेसकडे असलेल्या खारगर टोल नाक्याच्या वसुलीचा 10 कोटीचा महसूल बुडाल्याने पोलीस बंदोबस्तात हा टोल त्याच्याकडून एप्रिल 2019 मध्ये काढून घेऊन एमएसआरडीसीकडे देण्यात आला आहे.

फडणवीसांचा विरोध

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विरोधात होणाऱ्या तक्रारींबाबत चौकशीसाठी राज्य पोलिस तक्रार प्राधिकरण गठित करण्यात आला होता. 14 जुलै 2020 रोजी राजकुमार ढाकणे याच्या नियुक्ती संदर्भात राज्य शासनाच्या गृह विभागाने नोटीफिकेशन काढले होते. त्यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेच्या नियुक्तीला विधानसभेत आक्षेप घेतला होता. त्यानंतर गृह खात्याने चौकशी बसवली होती.

फडणवीसांच्या पत्रात काय?

राज्य सरकारच्या पोलिस ट्रिब्युनल अर्थात पोलिस तक्रार प्राधिकरणावर गृह विभागाने केलेल्या राजकुमार ढाकणेच्या नियुक्तीवरुन गेल्या वर्षीच मोठा वादंग उठला होता. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. पोलिस खात्यातील अंतर्गत तक्रार सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि सत्र न्यायालयाइतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.