रत्नागिरीत का वाढतो कोरोना? ही आहेत कारणे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव राहणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे.

0 17

रत्नागिरी: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव राहणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे. स्वॅब दिला की अहवाल येईपर्यंत आयसोलेट होणे गरजेचे आहे; मात्र तसे होत नाही. सौम्य लक्षणे असलेले अनेक होम आयसोलेट होतात, परंतु निर्बंध पाळत नाहीत. फिरत राहतात आणि संसर्ग वाढवत आहेत. यापूर्वी प्रशासनाकडुन शिक्के मारणे, कारवाई करणे हे होत होतं; मात्र ही जबाबदारी फक्त आरोग्य विभाग आणि प्रशासनाचीच आहे का? नागरिकांची काही जबाबदारी नाही का? नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.(ratnagiri-why-corona-growth-in-information-district-surgeon-dr-sanghamitra-fule-covid-19-update)

जिल्ह्यातील बाधितांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेईना. त्यावर निर्बंध पाळले नाही तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला. दिवसाला ४०० ते ५०० या दरम्यान बाधित मिळत आहेत. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची टक्केवारी नगण्य आहे. होम आयसेलेशनमध्ये असलेले निर्बंधांना फाटा देत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन आपल्या बाजूंनी सर्व प्रयत्न करीत असले तरी नागरिकांचीही जबाबदारी आहे; मात्र त्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले.

दुसऱ्या लाटेचा प्रभाव या जिल्ह्यांमध्ये कायम आहे, असे राज्य कृतिदलाकडुन सांगण्यात आले. याची काही प्रमुख कारणे देखील त्यांनी स्पष्ट केली आहेत. कोरोना चाचण्यांमध्ये झालेली मोठी घट, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) कमी प्रमाणात होणारी तपासणी, कोरोना प्रतिबंध नियमांचे होणारे उल्लंघन या प्रमुख आणि गांभीर्याने न घेतलेल्या कारणांमुळे आठ जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव कायम आहे, अशी निरीक्षणे कृति दलाने वर्तविली आहेत.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आरोग्य विभाग आणि प्रशानस आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करीत आहेत; मात्र लोक ऐकत नाहीत. कोरोना चाचणीसाठी लोक पुढे येत नाहीत. शिर्के हायस्कूल केंद्रावर चाचणीसाठी रांगा लागत होत्या. आता तिथे कोण येत नाही. शेतीच्या कामाला लोकं लागली आहेत; मात्र यात समाजाचेच नुकसान आहे.

एकूण बाधित -६६ हजार ८०८

* एकूण कोरोनामुक्त -६० हजार ९०९

* बाधित बरे होण्याचा प्रमाण – ९१.१७

* गृह विलगीकरणात- १ हजार ६२४ जणं

*संस्थात्मक विलगीकरणात- २ हजार ३१ जणं

* एकूण मृतांची संख्या -१ हजार ९०५

* मृत्यूदर -२.८५ टक्के

Leave A Reply

Your email address will not be published.