‘मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही’ या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी दिले ‘हे’ उत्तर

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आले. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

0 46

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना दुसरीकडे आग लागण्यासह अनेक दुर्घटना घडत आहे. या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असे असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घराबाहेर न पडता केवळ सोशल मिडियाद्वारे जनतेशी संवाद साधत आहे.

यावर विरोधकांसह जनतेच्या मनात संभ्रम आहे. हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विचारण्यात आले. ABP माझाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

“एखादी दुर्घटना झाली की त्या ठिकाणी एक यंत्रणा काम करत असते. तिथे पोलीस, मेडिकल टीम, प्रसारमाध्यमं काम करत असतात. जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कोणीही तिथं गेलं की आमच्यामागे यंत्रणा उभी राहते.

व्हीआयपी व्यक्तीने भेट दिली की तिथे काम करणारी सगळी यंत्रणा डायवर्ट होते. दुर्घटनेनंतर आरोग्यमंत्री, पालकमंत्री तिथे पोहोचून प्रत्येकाने जे काम करायचं असतं त्यासंबंधी सूचना देत असतात. खूप वेळा वॉररुममध्ये राहून सर्व कामकाज कसं सुरु असतं हे पाहायचं असतं आणि सध्या तेच अपेक्षित आहे,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

“फक्त आपल्याच नाही तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून हे होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सांगड घालून काम करायचं असतं ते दोन्ही जागांवरील प्रमुख करत असतात,” असंही त्यांनी सांगितलं.

“प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो, तेथील काही ठराविक लोकप्रतिनिधी असतात. तिथे पोहोचून हवी ती मदत ते करत असतात. एकत्र काम केल्यानंतर प्रत्येकाने टीव्हीवर जाण्याची गरज नसते,” असं सांगत यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज लसीकरणासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्वाची बैठक घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.