वन्यजीव प्रेमीनी विझवली जंगलातली आग

0 0

शंकरपूर :

शंकरपूर येथून जवळच असलेल्या आंबोली लोहारा झुडपी जंगलात वन्यजीव प्रेमींना आग लागल्याचे निदर्शनात आले असता ती विजवण्यात आली.

शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य आमोद गौरकर व मूल येथील वन्यजीव प्रेमी राहुल झिरकुंटवार फिरायला गेलो असता आंबोली लोहारा झुडपी या जंगलात आग लागल्याचे दिसून आले.

या जनगलांत काळवीट चितळ नीलगाय आदी प्राण्यांचे वास्तव्य आहे या जंगलात मोठया प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले हळूहळू ही आग संपूर्ण झुडपी जंगलाला वेढली असती त्यामुळे समोर मोठा अनर्थ घडू नये यासाठी या दोन वन्यजीव प्रेमींनी ही आग विझविण्या साठी आटोकाट प्रयत्न केले तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमाने ही आग आटोक्यात आणली .

याबाबत ची माहिती चिमूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे भिसी चे वनपाल औतकर यांना माहिती दिली विशेष म्हणजे हे जंगल काळवीट प्राण्यासाठी प्रसिध्द आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.