Covid-19 Vaccine Free: महाराष्ट्रातील जनतेला मोफत लस देणार? पाहा अजित पवार काय म्हणाले

Free Vaccine for Maharashtra: राज्यातील जनतेला मोफत लस देण्यात येणार का? या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात.

0 11

पुणे : महाराष्ट्रात कोरोना लसीकरण (Covid vaccination) मोठ्या वेगाने होत आहे. सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांत देशात महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि 45 वर्षांवरील नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. तर 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 1 मे पासून करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रातील नागरिकांना मोफत लस (Free vaccination) देणार का? असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांना विचारला असता त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली पाहूयात.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारची भूमिका आहे की या खर्चाची जबाबदारी राज्य सरकारने उचलावी तर सर्वच राज्य सरकारांची भूमिका आहे की केंद्र सरकारने जबाबदारी उचलावी. एकमेकांवर सोडून चालणार नाही. आम्ही या संदर्भात ग्लोबल टेंडर काढणार आहोत. यासाठी पाच जणांची कमिटी तयार केली आहे.

ग्लोबल टेंडरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कोरोना प्रतिबंधक लस यांचा समावेश आहे. ग्लोबल टेंडर काढण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्या आहेत. यानंतर 1 मे रोजी मुख्यमंत्री मोफल लसीकरणाच्या संदर्भात आपली भूमिका आहे ती जाहीर करतील.

पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी बंद प्लँट चालू करणार आहोत. साखर कारखान्यांचा पर्याय तपासला जाईल. ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी शरद पवारांच्या सूचनेनुसार साखर संघांशी बोलणं सुरू आहे. लसीच्या संदर्भात सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बोलणं झाले आहे. पुण्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत असून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही चांगली बाब आहे. असंही अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.