पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती…
-दीड किलोमीटर जावे लागतात पिण्याच्या पाण्यासाठी -विज भरणा न केल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वीजपुरवठा खंडित -दोन लाख सात हजार रुपये वीजबिल भरणा बाकी
शंकरपुर : येथून जवळच असलेल्या आंबोली येथील महिला मागील चार पाच दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी शेतामध्ये भटकंती करत असून दीड किलोमीटर त्यांना पाण्यासाठी जावे लागत असल्यामुळे महिलांना ग्रामपंचायत च्या निष्काळजीपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे.
या ग्रामपंचायतवर कडून दोन लाख सात हजार रूपये वीज बिल आहे हे बिल ग्रामपंचायत ने न भरल्यामुळे वीज वितरण कंपनी ने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे याचा फटका गावातील नागरिकांना बसत असून मागील चार दिवसांपासून पिण्याचे पाणी नळाला येत नाही त्यामुळे गावातील महिलाना दीड किलोमीटर शेतातील विहिरीचे पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
या गावाची लोकसंख्या चार हजाराच्या वर असून ग्रामपंचायत कडून तीनशे च्या वर नळ कनेक्शन जोडणी देण्यात आले आहे परंतु वीज कपात करण्यात आले असल्याने या नळाला पाणीच येत नाही( सामान्य फंडात पैसे नसल्याने वीज बिल भरण्यात आले नाही जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी गावातील एक विहीर स्वच्छ करण्यात आली आहे वीज बिल दोन दिवसात भरुन नळ योजना सुरू करण्यात येईल शालिनी दोहतरे सरपंच आंबोली)