शंकरपूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला

शंकरपूर येथे शेतकऱ्याच्या बांधावर खत वाटप शंकरपूर

0 32

येथील मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग या कार्यालयांतर्गत येणाऱ्या शेतकरी गटांना शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे वाटप कार्यक्रम घेण्यात आला कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर कृषि केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे पुरवठा करण्यात आला या उपक्रमाचा भाग म्हणून शंकरपूर जवळील वाकरला येथील बालाजी शेतकरी स्वयंसाहाय्यता बचत गट व आजगाव येथील सिद्धी शेतकरी स्वयंसहाय्यता बचत गट यांनी रासायनिक खते व बियाणाची उचल करण्यात आली या कार्यक्रमाचा शुभारंभ शंकरपूर येथील सरपंच साईश वारजुकर यांनी हिरवी झेंडी देऊन केली तसेच गावात जाऊन कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बियाण्याची उगवणक्षमता तपासणे, बीज प्रक्रिया, भात बियाण्याची लागवड ,कापूस व सोयाबीन यांची पेरणी पद्धत व पिकाचे नियोजन यावर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी ,कृषी सहाय्यक, बचत गटाचे अध्यक्ष, सचिव कृषी केंद्राचे संचालक वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते

जागतिक पर्यावरण दिन साजरा शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळ व वन विभाग कार्यालय शंकरपूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून मंडळ व वन विभागाने वाघाई नर्सरी येथे 50 कडुनिंबाचे रोपटे लावून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या सोबतच वाघाई जंगलात निसर्ग भ्रमण तर डोंगरगाव तलाव येथे पक्षी निरीक्षण करण्यात आले जागतिक पर्यावरण दिना चे महत्त्व ओळखून यु बी लोखंडे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वनरक्षक केदार सोनुले भैसारे तथा तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.