Coronavirus : अवघ्या ४ किमीसाठी रुग्णवाहिकेचं भाडं १० हजार रुपये, IPS अधिकारी संतापले

"आज जग आपल्याला बघतंय...फक्त विध्वंसच नाही तर आपली नैतिक मूल्येही"

0 40

एकीकडे करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटीचा सामना करताना हजारो जणांना समस्यांचा सामना करावा लागतोय. उपचार आणि चाचणीसाठी अनेकजण रस्त्यावर आल्याचं चित्र असतानाच काळाबाजार करणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातलगांकडून मनाप्रमाणे पैसे वसुल केले जात असल्याच्या अनेक बातम्या येत आहेत. राजधानी दिल्लीतूनही असंच एक वृत्त समोर आलं आहे. अवघ्या चार किमी प्रवासासाठी रुग्णवाहिकेने तब्बल १० हजार रुपयांचं बिल आकारल्याचं समोर आलं आहे.

आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी रुग्णवाहिकेने आकारलेल्या बिलाची कॉपी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात फक्त चार किमीच्या प्रवासासाठी रुग्णाच्या नातलगांकडे १० हजार रुपये आकारण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. “चार किमी प्रवासासाठी १० हजार रुपये…हे दिल्लीतील रुग्णवाहिकेचं भाडं…आज जग आपल्याला बघतंय…फक्त विध्वंसच नाही तर आपली नैतिक मूल्येही” अशा आशयाचं ट्विट करत बोथरा यांनी या संकटकाळातही अव्वाच्या सव्वा पैसे वसुल करणाऱ्यांविरोधात एकप्रकारे संताप व्यक्त केलाय.

बोथरा यांनी ट्विट करताच या बिलाचा फोटो व्हायरल झाला असून त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांच्याही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण आपआपले अनुभव सांगत आहेत. एका व्यक्तीने तर हैदराबादमध्ये अवघ्या १० किमी प्रवासासाठी तब्बल ३० हजार रुपये रुग्णवाहिकेसाठी मोजावे लागल्याचं सांगितलं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.