कोव्हिड संबंधित कर्तव्य बजाव-या शिक्षकांना लेखी आदेशित करा

0 9

शेगांव :
कोरोना संसर्ग संबंधित कर्तव्ये बजावतांना कोव्हिडमुळे राज्यातील अनेक शिक्षकांच मृत्यु झालेला आहे, सानुग्रह सहाय्य लागू करण्याचे आदेश दि.२९ मे २०२० च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत,कोरोना संदर्भातील गावपातळीवर अनेक कामे शिक्षकांना करावी लागत आहेत म्हणून सदर विमा कवच असलेला दावा सिद्ध करण्यासाठी शिक्षकांना लेखी आदेशित करण्यात यावे अशी मागणी दि.१७ मे रोजी गटविकास अधिकारी सतिष देशमुख व गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांच्याकडे शिक्षक समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोना संदर्भात असलेल्या चेक पोष्टवरील नियुक्ती,कोरोना संसर्ग तपासणी संदर्भातील कुटुंब गाव सर्वेक्षण,आरोग्य विभागाअंतर्गत आयोजित करण्यात येत असलेले लसीकरण नोंदणी शिबिरे याकरिता तसेच कोरोना संसर्ग संदर्भातील अन्य कामकाजाकरिता शिक्षकांना लेखी आदेशित करण्यात यावे.शिक्षक हे कोरोना संदर्भातील फ्रंट लाईन वर्कर म्हणून कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांच्या संपुर्ण कुटुंबियांचे कोरोना संसर्ग प्रतिबंधक लसीचे लसीकरण करण्यात यावे, शिक्षकांना सदर कर्तवे बजावतांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून मास्क,हॅन्डक्लोज,सॅनिटायझर,ऑक्सिमिटर,शारिरीक तापमानाची नोंद घेण्याकरिता डिजिटल थर्मामीटर आदि सर्व सुरक्षिततेची साधने पुरवण्यात यावी व सदर
आदेश निर्गमित करतांना वय वर्षे पन्नास पुर्ण झालेल्या तसेच दुर्धर आजारग्रस्त असलेले मधुमेह ,रक्तदाब श्वसनाचे विकार असलेल्या शिक्षकांना व महिला शिक्षिकांना सदर कर्तव्यातून वगळण्यात यावे या मागण्या सुद्धा निवेदनामार्फत करण्यात आलेल्या आहेत.
सदर मागणीची गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांनी तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सचिव यांना सदर कार्य करित असलेल्या शिक्षकांना कोरोना प्रतिबंधक साहित्य सामुग्री पुरविण्यासंदर्भात तात्काळ आदेश निर्गमित केलेले आहेत.
याप्रसंगी शिक्षक सेनेचे तालुका अध्यक्ष सुनिल घावट,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत झनके,म.रा.शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष दादाराव भारंबे,जुनी पेन्शन हक्क लढा समितीचे अध्यक्ष नवल पहुरकर,उर्दु संघटनेचे प्रतिनिधि मो.शकिल शे.इब्राहिम,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकारी अंनतराव वानखडे,शिक्षक सेनेचे तालुका उपाध्यक्ष संजय इंगळे,प्रमोद इंगळे आदीची उपस्थिती होती.

गटविकास अधिकारी सतिष देशमुख यांना निवेदन सादर करताना शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी

गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट यांना कोरोना संसर्ग संदर्भातील मागणीचे निवेदन सादर करतांना शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.