शेतात ४५ वर्षाय महिलेवर बलात्कार; घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल

आरोपींनी महिलेचा पाठलाग करून तिला पकडलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

0 2

हायलाइट्स:

  • महिलेवर सामुहिक बलात्कार
  • बलात्कारानंतर व्हिडिओही केला व्हायरल
  • यवतमाळमधील संतापजनक घटना

यवतमाळ : शेत शिवारात एका ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील डेहणी इथं घडली आहे. तसंच सदर घटनेचा दोन आरोपींनी अश्लील व्हिडीओ बनवून समाज माध्यमावर व्हायरल केल्याची धक्कादायक माहिती पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीतून पुढे आली आहे.

याप्रकरणी आर्णी पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन एकास अटक केली आहे. ६ मे रोजी घडलेल्या या गंभीर घटनेची फिर्याद पीडित महिलेने २५ मे रोजी आर्णी पोलिस स्टेशनला दिली. फिर्यादी पीडित महिला ही ६ मे. रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान डेहणी शिवारातील एका शेतातून जात असताना आरोपी अमोल प्रल्हाद आठवले (वय ३९) याने सदर महिलेचा वाईट उद्देशाने पाठलाग करुन तिला खाली पाडले आणि जबरदस्तीने बलात्कार केला.

महिलेवर आरोपी बलात्कार करत असताना घटनास्थळी हजर असलेले आरोपी आकीब खाँ वाजीद खाँ (वय २०) व शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन (वय १७) यांनी अश्लील व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये काढला. सदर व्हिडिओ शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन याने फिर्यादीला तिचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यानेही फिर्यादीवर बलात्कार केला आणि कोणाला काही सांगितले तर तुझा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

आरोपी आकीब खाँ वाजीद खाँ आणि शेख आकीब उर्फ मोनु शेख इस्लामुद्दीन यांनी २४ मे रोजी सदर व्हिडिओ व्हायरल केला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले असून तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात अमोल आठवले याला अटक करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, या घटनेबाबत परिसरात संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.