तरुणाने रिक्षावर केली दगडफेक; परिसरात खळबळ

अनेक रिक्षांच्या काचा फोडल्याची तक्रार नागरिकांनी सकाळी शहर पोलिसात दिली आहे.

0 3

हायलाइट्स:

  • रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या
  • गेल्या काही दिवसांत अनेक घटना घडल्याचा दावा
  • यवतमाळ शहरातील घटना

यवतमाळ : शहरातील नेताजी नगर परिसरात एका तरूणाचे उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचांची तोडफोड केली. ही घटना गुरूवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली असून या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.

शहरातील नेताजी नगर परिसरातील हरिष मानकर या युवकाचे गुरूवारी मध्यरात्री परिसरात उभ्या असलेल्या रिक्षाच्या काचा फोडल्या. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली होती. या युवकाने अनेक रिक्षांच्या काचा फोडल्याची तक्रार नागरिकांनी सकाळी शहर पोलिसात दिली आहे.

या घटनांमुळे रिक्षाचालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सदर तरूणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी युवकावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस करत आहे.

दरम्यान, हा युवक रिक्षांच्या काचा का फोडतो, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र आरोपी युवकाच्या प्रतापामुळे परिसरातील रिक्षाचालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. सदर तरुण असं कृत्य का करतो, याबाबत पोलिस तपासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.