औरंगाबादेत भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले, तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा, कुटुंबावर शोककळा

0 13

शहरालगत असणाऱ्या वाळूज महानगरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडले आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की, यामध्ये तरुणाच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.

 

औरंगाबाद : वाळूज महानगरात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भरधाव ट्रकने एका तरुणाला चिरडले आहे. हा अपघात एवढा भीषण आहे की, यामध्ये तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा झालाय. वाळूज महानगरातील कामगार चौकात ही घटना घडली असून शेख फेरोज असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. (young man died in accident who crushed by truck Waluj Aurangabad Mahanagar)

तरुणाचा अक्षरश: चेंदामेंदा 

मिळालेल्या माहितीनुसार 14 जून रोजी हा अपघात घडला. एक दुचाकी तसेच ट्रकचा हा अपघात आहे. यामध्ये ज्या ट्रकखाली मृत तरुण आला तो ट्रक भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. ट्रकचा वेग जास्त असल्यामुळेच दुचाकीवरील तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. या अपघातात तरुण दुचाकी चालक ट्रकखाली आल्यामुळे त्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. एवढेच नाही तर ट्रकने या मृत तरुणाला तब्बल 25 फूट फरफटत नेले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अपघात झाल्यानंतरचा व्हिडीओ तसेच मृत तरुणाचे फोटो सोशल मीडियावर दिवसभर फिरत होते.

शेख फेरोजच्या कुटुंबीयांवर शोककळा

दरम्यान, या दुर्घटनेत तरुण ज्या दुचाकीवर चालला होता ती दुचाकीसुद्धा फुटली आहे. दुचाकीची परिस्थिती पाहून या अपघाताची तीव्रता काय असावी याबाबत अंदाज बांधला जाऊ शकतोय. घरातील तरुण आणि कमावता मुगला गमावल्यामुळे शेख फेरोजच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हा अपघात ज्या लोकांनी प्रत्यक्षपणे पाहिला आहे तेही हळहळ व्यक्त करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.