‘तुझी लायकी नाही, तुझ्यासोबत माझ्या मुलीचे लग्न करणार नाही’, प्रेयसीच्या आईचा दम, नंतर प्रियकराने जे केलं त्याने टिटवाळा हादरलं

0 35

टिटवाळा (ठाणे) : ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा शहरात एक भयानक घटना समोर आली आहे. प्रेमात आड येणाऱ्या अल्पवयीन प्रेयसीच्या आईची प्रियकराने हत्या केली आहे. या हल्ल्यामुळे टिटवाळ्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी समीर दळवी याला अटक केली आहे. पोलिसांना मृतक महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या. टिटवाळा पोलिसांनी जवळपास 10 दिवसांनी या हत्येचं गूढ उकललं.

नेमकं प्रकरण काय?

टिटवाळा येथील इंदारनगर परिसरात सोनी देवराज शेरवे ही 39 वर्षाची महिला तिच्या कुटुंबासोबत राहत होती. सोनी ही महापालिकेत कंत्राटी कामगार होती. सोनी 4 जुलै रोजी नेहमीप्रमाणे कामावर गेली. त्याचदिवशी तिने तिची सावत्र मुलली फोन करुन आपण गुरवली येथे काही फळे घेण्यासाठी जात आहोत. त्यामुळे तोपर्यंत घरावर लक्ष ठेव, असं तिने सांगितलं. सोनीचा संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोबाईल सुरु होता. मात्र त्यानंतर तिचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. ही बाब तिच्या मुलीने त्यांच्या नातेवाईकांना सांगितली.

पोलिसांना कुजलेला मृतदेह सापडला

महिलेच्या नातेवाईकांनी तिचा गुरवली जंगलात शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्यानंतरही ती सापडली नाही. अखेर टिटवाळा पोलीस ठाण्यात सोनी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. टिटवाळा पोलीस सोनीचा शोध घेत होते. या दरम्यान तिचा मृतदेह गुरवली परिसरात सापडला. सोनीच्या मृतदेहाची प्रचंड दुरावस्था झाली होती. पोलिसांच्या हाती जेव्हा तो मृतदेह लागला तेव्हा तो कुजलेल्या अवस्थेत होता.

सोनीच्या मुलीनेच प्रियकराला आईविषयी माहिती दिली

या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी तपासाकरीता काही पथके नेमली. मृतक सोनीच्या संपर्कात असलेल्या सर्व नातेवाईकांची पोलिासांनी विचारपूस केली. या दरम्यान पोलिसांना माहिती पडले की, सोनीची सावत्र मुलगी आणि समीर यांच्यात प्रेमसंबंध आहेत. याच मुद्द्यावरुन काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी सोनीचे समीरसोबत भांडण झाले होते.

अखेर आरोपीला बेड्या

सोनीने समीरला तुझी लायकी नाही. तुझ्याशी माझ्या मुलीचे लग्न करणार नाही, अशा शब्दात दम भरला होता. सोनीचे हेच बोल मनात धरुन त्याने रागात सोनीची हत्या केली. तपास अधिकारी विजय सूव्रे यांनी तपासाची सूत्रे फिरवून समीर याला ताब्यात घेत विचारपूस केली असता समीर याने त्याने केलेला गुन्हा कबूल केला. ज्यादिवशी सोनी ही गुरवलीच्या जंगलात गेली होती मुलीने ही गोष्ट समीरला सांगितली होती. समीर याने त्याचा फायदा घेतला. समीरने सोनीला जंगलात एकटे गाठले. गळा दाबून तिची हत्या केली. अखेर पोलिसांनी समीरला अटक केली आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे (youth killed his girlfriend mother in Titwala).

 

Leave A Reply

Your email address will not be published.