Dasara Melava: राज्यात दसरा मेळाव्यावरुन महाभारत होणार, शिवसेनेचा शिंदे गटाला इशारा
Yuva Sena Leader Sharad Koli Criticised And Warn Eknath Shinde Group Dasara Melava
दसरा मेळाव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. दसरा मेळावाबाबत शिवसेनेच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी आहे. दरम्यान, यातच युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून टीका करत, दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ मिळाले नाही, तर राज्यात रामायण-महाभारत होईल, असा इशारा दिला आहे. (yuva sena leader sharad koli criticised and warn eknath shinde group dasara melava )
दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार यावरून शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे गट पुन्हा एकदा भिडण्याची शक्यता आहे. बीकेसीतील एमएमआरडीएचे मैदान शिंदे गटाला देण्यात आले आहे. शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळाणार, याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. मात्र दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर जमण्याचे आदेश ठाकरे गटाकडून देण्यात आले आहे.
उद्धव सेना ही परंपरेप्रमाणे दरवर्षी प्रमाणे शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी जाणार आहेत. शिवसैनिक कुणालाही जुमानणार नाहीत. उद्धव ठाकरेंसाठी लाखोंच्या संख्येने शिवतीर्थावर उपस्थित राहण्याचे आवाहन करत, बऱ्या बोलाने शिवसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी द्या, नाहीतर राज्यात रामायण-महाभारत होईल, असा थेट इशारा कोळी यांनी दिला आहे.
तर, चंद्रकांत खैरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू असा इशारा खैरे यांनी दिला आहे. शिवाजी पार्क सील केलं तर ते तोडून टाकू, पण शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा निर्धार खैरेंनी व्यक्त केला आहे. ठाकरे गटाच्या या आक्रमक भूमिकेवर शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोडून आणि घुसून सभा घेता येत नाही. शिवाजी पार्कवर कोणीही घुसखोरी करुन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सरकारच्या सर्व सरकारी यंत्रणा सज्ज आहेत, असा अप्रत्यक्ष इशारा अब्दुल सत्तार यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
शरद कोळी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी
शरद कोळी यांच्या या इशाऱ्यामुळे आता शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्या कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शरद कोळींचं नाव दमदाटी, धमकावणे, खंडणी, तडीपार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.