जिल्हा परिषद शिक्षक व इतर कर्मचा-यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

0 5

शेगांव : 
पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी विषय शिक्षक विश्वनाथ नेमाडे,राहणार हिंगणा वैंजनाथ यांचे दि.३१ मे रोजी खामगाव नजिक असलेल्या जयपुर लांडे येथे झालेल्या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रगती नेमाडे,सार्थक नेमाडे वय १२ व समर्थ नेमाडे वय ५ अशी दोन लहान मुले व आईवडील असा आप्त परिवार आहे.अचानक झालेल्या त्यांच्या या जिवीतहानीमुळे कुटुंबियांवर अचानक दु:खाचा डोंगर कोसळला असल्यामुळे त्यांच्या या दु:खात शिक्षक सेना,कास्ट्राईब संघटना,शिक्षक संघ,जुनी पेन्शन हक्क संघटना,उर्दू शिक्षक संघटना,उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटना या सर्व शिक्षक संघटना सहभागी झालेल्या असुन तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना आर्थिक अर्थ सहाय्य करण्यासाठी सरसावलेल्या आहेत,या अर्थ सहाय्याकरिता शिक्षक समन्वय समितीचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक, पंचायत समितीचे कर्मचारी व खाजगी व्यवस्थापनाच्या शिक्षकांनी १,८३,९०१ रुपये रक्कमेचे संकलन करून त्यांच्या मुलांचे शिक्षण तसेच कुटुंबियांना आर्थिक अडचणीच्या वेळी हातभार लागावा या सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने व मानवतेच्या दृष्टीकोनातून आर्थिक सहाय्यता निधीचा धनादेश त्यांच्या पत्नी प्रगती विश्वनाथ नेमाडे यांच्याकडे गटविकास अधिकारी सतिष देशमुख,गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट,जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने,शिक्षण विस्तार अधिकारी एन.जे.फाळके यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे.
तालुक्यातील शिक्षक समन्वय समिती सदैव शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवण्यासोबतच सामाजिक उत्तरदायीत्व स्विकारून शिक्षकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन सामाजिक कार्यात जिल्हयामध्ये अग्रेसर ठरलेली आहे.
याप्रसंगी शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष संजय इंगळे,प्रमोद इंगळे,संपर्क प्रमुख धनंजय कातखेडे,
उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिपक दामोदर,शिक्षक संघाचे पदाधिकारी संजय पाटील, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत झनके,जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुका अध्यक्ष नवल पहुरकर,जिल्हा पदाधिकारी अनंतराव वानखडे, सुनिल तांदळे,विनोद खवले,प्रविण कात्रे,समुह साधन केंद्राचे कर्मचारी विक्रम फुसे,राहुल ससाणे,श्रीकांत सोनोने,शिक्षक विनोद परतेकी,ज्ञानेश्वर बाजारे आदीची उपस्थिती होती.

दिवंगत विश्वनाथ नेमाडे

अर्थ सहाय्यता निधीचा धनादेश प्रगती नेमाडे यांना सुपूर्द करतांना जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ भोजने,गटविकास अधिकारी सतिष देशमुख,गटशिक्षणाधिकारी प्रकाश केवट व समन्वय समितीचे पदाधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.